दीपिका पादुकोण बॉलिवुडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या आपल्या स्टाईल सेंससाठी ओळखल्या जातात. विशेष म्हणजे त्यांचा एयरपोर्ट लुक्स सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच दीपिका लंडनला रवाना झाली होती. यावेळी मुंबई विमानतळावर तिला स्पॉट करण्यात आले होते. याप्रसंगी दीपिकाने व्हाईट कलरचा कोट आणि पॅंटसह गॉगल्स परिधान केलेला होता.
ओव्हरऑल या लुकमध्ये दीपिका खूपच स्टनिंग वाटत होती. यावेळी दीपिकाच्या कोटने लोकांचे सर्वाधिक लक्ष वेधले. हा कोट खूपच मोठा होता आणि तिचा लुकही जरा हटके असल्याने लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले.
ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नसून दीपिकाच्या ड्रेसिंग सेंस आणि फॅशन चॉईसवरून याआधीही तिला अनेक वेळा ट्रोल करण्यात आले होते. परंतु दीपिकाला याचा काहीही फरक पडत नाही. परंतु ज्या कॉन्फिडेंसने दीपिका या मॉडर्न ड्रेसमध्ये झळकत होती, ती खुपच उत्कृष्ट वाटत होती.
सांगायचे झाल्यास दीपिका ही मेघना गुलजारच्या आगामी “छपाक’मध्ये ऍसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवाल हिची भुमिका साकारत आहे. याशिवाय ती “83′ या बायॉपिकमध्ये ही झळकणार आहे. या चित्रपटात ती पती रणवीरसोबत काम करणार आहे.