मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकताच मुंबई ऍकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत स्वत: दीपिकाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या निर्णयामुळे दीपिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दीपिका पदुकोणने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, एमएएमआयच्या बोर्डवर असणे आणि अध्यक्ष म्हणून काम करणे हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव आहे. एक कलाकार म्हणून चित्रपट आणि माझे कलागुण एकत्र मला माझ्या घरी दुसऱ्या अर्थात मुंबईत घेऊन आले.
माझ्याकडे सध्या बरीच कामे आली आहेत. त्यामुळे मी एमएएमआयवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.’ दरम्यान, दीपिका पदुकोण तिच्या आगामी प्रोजेक्ट, सामाजिक कार्य आणि इतर सुविधांची माहिती देखील उपलब्ध करून देईल. दीपिका लवकरच “83′ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.