मुंबई – बॉलीवूडमधील कलाकार आणि अन्य सेलिब्रिटीज यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आणि त्यांच्याबाबत अपशब्द वापरणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. अनेकवेळा आलोचक आणि ट्रोलर्स कोणत्या-न-कोणत्या गोष्टीवरून सोशल मीडियावर चित्रपट कलाकारांविरोधात गरळ ओकताना दिसत असतात. अशा प्रकारामुळे अनेकदा कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागत असतो.
काही दिवसांपूर्वीच असाच काहीसा प्रकार अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत घडला आहे. इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने दीपिकाला थेट शिवी देत तिच्याबाबत अपशव्द वापरले होते. दीपिकाने देखील त्याला सडेतोड उत्तर देत त्याचे तोंड बंद केले. दीपिकाने सोशल मीडियावर संबंधित व्यक्तीच्या मॅसेजचा एक स्क्रीनशॅट काढत फोटो पोस्ट केला आहे.
यात तिने, संबंधीत व्यक्तीच्या मॅसेजला सर्कल करत हायलाइट केले आहे. तसेच तुमचा परिवार आणि मित्र हे पाहून तुमच्यावर गर्व करत असतील, अशी खोचक टिपण्णी तिने केली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास हे वर्षे दिनीकासाठी खूपच व्यस्त राहणार आहे. ती लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत “शकुन बत्रा’मध्ये झळकणार आहे.
याशिवाय ती अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्यासोबत एक चित्रपट साकारत आहे. तसेच पती व अभिनेता रणवीर सिंहसोबत ती “83’मधून चाहत्यांच्या भेटिला येत आहे.