…आणि काँग्रेसनं आपल्या प्रचार गीतातील ते कडवं हटवलं 

नवी दिल्ली : मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आगामी लोकसभा निवडणुकांसाठी बनवण्यात आलेल्या पक्षाच्या प्रचार गीतामध्ये बदल केले आहेत. काँग्रेसच्या प्रचार गीतामधील एक कडवं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून असल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने काँग्रेसला ते विवादित कडवं काढून टाकण्याचा आदेश दिला होता.

निवडणूक आयोगाच्या माध्यम देखरेख समितीने शनिवारी काँग्रेसच्या या प्रचार गीतातील पंतप्रधानांना उद्देशून असणाऱ्या कडव्यावर आक्षेप नोंदवला होता. या नंतर काँग्रेसने प्रचार गीतामध्ये बदल केल्याने निवडणूक आयोगाच्या माध्यम देखरेख समितीने काँग्रेसच्या ‘मै ही तो हिंदुस्थान हू’ या प्रचार गीताला हिरवा झेंडा दाखवला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने देशभरामध्ये राज्य आणि जिल्हा पातळीवर माध्यम देखरेख समितीची स्थापना केली असून या समितीद्वारे राजकीय पक्षांच्या जाहिराती तसेच प्रचार संबंधी सामग्रीची तपासणी केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.