पुणे – बॉलीवूडमध्ये मलायका अरोराचे सौंदर्य, फिटनेस आणि चिरतारुण्याची चर्चा नेहमीच असते. मलायका फिटनेसच्या टिप्स देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच अपलोड करत असते. अर्जुन कपूरबरोबरच्या अफेअरमुळे सतत चर्चेत असणारी मलायका आता पूर्वाश्रमीचा पती अरबाझ खानमुळे चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
विभक्त झाली असली तरी मलायका आणि अरबाझ यांच्यातील मैत्रीचे संबंध अजूनही कायम आहेत. मलायकाला अरबाझने एक खास भेट पाठवली आहे आणि मलायकाने या भेटीबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली आहे. ही भेट म्हणजे कोणताही महागडा दागिना अथवा गाडी, बंगलाही नाही. तर अरबाझने मलायकाला चक्क डबाभर आंबे पाठवून दिले आहेत. हा डबा उघडल्या उघडल्यावर मलायकाला अतिशय आनंद झाला आहे.
View this post on Instagram
तिने या खास भेटीबद्दल अरबाझ खान आणि आंबेविक्रेत्यालाही मनापासून धन्यवाद दिले आहेत. एकेकाळी आयटम सॉंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायका आणि अरबाझ खान यांचे 1998 मध्ये लग्न झाले होते. तब्बल 19 वर्षांचा संसार झाल्यावर 2017 मध्ये ते विभक्त झाले. या दाम्पत्याला अरहान नावाचा मुलगाही आहे. मलायका अर्जुन कपूरबरोबर विवाह करणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.
View this post on Instagram