बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या आगामी “रश्मी रॉकेट’ चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा नुकताच श्रीगणेशा करण्यात आला आहे. या सेटवरचा एक फोटो तापसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या फोटोत ती ऍथलीट ट्रॅकवर धावताना दिसत आहे. तापसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिले की, “फिनियास मार्कच्या अर्ध्या मार्गावर. पाय चालवण्यापासून पाय हलवण्यापर्यंत.. संगीत रोल करा आणि ..हॅलो गारबो करवा. हॅशटॅग रश्मी रॉकेट.’ तापसीचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या फोटोला असंख्य लाईक्स् मिळत असून चाहत्यांकडून तापसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावर अन्य कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया देत तापसीला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, तापसीने बुधवारी इंस्टाग्रामवर चित्रपटाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोसह तिने लिहिले की, रांचीतील शूट पूर्ण झाले आहे. अखेर मी माझी शर्यत संपविली आहे.
View this post on Instagram
खेळाडूंचा असा कोणताही दिवस जात नाही ज्या दिवशी ते सराव करत नाही. अशा वास्तविक जीवनातील खेळाडूंना माझा सलाम. मला आनंद आहे की मला खऱ्या आयुष्यात असे करावे लागले नाही. हॅशटॅग रश्मी रॉकेट.