निमोणे:- सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार प्रचारादरम्यान निमगाव म्हाळुंगी येथे गावभेट दौऱ्यावर होते. त्यावेळी भाषण करताना ते भावुक झाल्याचे पहायला मिळाले. एरव्ही कठोर वाटणाऱ्या अशोक पवार यांच्या हळव्या स्वभावाची सर्वांनाच प्रचिती आली. अन् यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु दाटून आले.
दरम्यान, वाघोली येथे एका मुलीला डंपरने धडक दिल्याने अपघात झाला होता. यावेळी योगायोगाने आमदार अशोक पवारही तेथून जात होते. अशोक पवार यांनी गाडी थांबवत त्या अपघातग्रस्त मुलीला मदत करत पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलीची भेट घेत तिला हॉस्पिटलमधील उपचारासाठी मदत केली.
परंतु उपचारादरम्यान त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिरुर तालुक्यात गावभेट दौऱ्यावर असताना उपस्थित लोकांना हा प्रसंग सांगताना अशोक पवार भावुक झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे उपस्थित लोकांच्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या. त्यामुळे एरव्ही विरोधकांच्या कोणत्याही टिकेला न घाबरता सडेतोड उत्तर देणाऱ्या अशोक पवारांच्या हळव्या स्वभावाची उपस्थित लोकांना प्रचिती आली.