…आणि अक्षय कुमारने पुन्हा वाढवले मानधन

मुंबई – अक्षय कुमार सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणारा ऍक्‍टर आहे. सतत काम करत राहणारा अक्षय एकही दिवस ब्रेक घेत नाही. त्यामुळे इतर कलाकारांचा वर्षाला एक सिनेमा रिलीज होतो. तर अक्षय कुमारचे 4-5 सिनेमे रिलीज होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयचे अनेक सिनेमे 2021 आणि 2022 मध्येही रिलीज होणे बाकी आहेत. आता अक्षयने आपले मानधन वाढवले आहे. एका सिनेमासाठी तो 99 कोटी रुपयांऐवजी तब्बल 108 कोटी मानधन घेत होता. तेही वाढवून त्याने मानधनाचा आकडा 117 कोटी रुपये केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

मात्र आता 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या प्रत्येक सिनेमासाठी अक्षयने आपले मानधन 135 कोटी रुपये केले आहे. सॅटेलाईट, डिजीटल, म्युजिक, राईटस आणि बॉक्‍स ऑफिसवर होणारे कलेक्‍शन पाहता अक्षयचा कोणताही सिनेमा 200 कोटींच्या वर धंदा करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयचा सिनेमा सुपरहिट होणार अशी निर्मात्यांना खात्री असल्याने एवढे पैसे त्याच्यासाठी मोजायला निर्मातेही तयार आहेत. अक्षयने आपल्या काही निवडक मित्र असलेल्या निर्मात्यांसाठी मानधनात सवलत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

फिरोज नाडियादवालाला त्याने 20 टक्के सवलत दिली अहे. सध्या अक्षयकडे ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’, ‘मिशन लॉयन’ आणि ‘रक्षा बंधन’ हे सिनेमे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.