…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज बारामती तालुक्‍यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. माळेगावात दुपारी अजित पवारांची सभा सुरू होती. ही सभा रस्त्यालगतच सुरु होती. सभा ऐन रंगात असताना अचानक रस्त्यावरुन भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या दोन गाड्या एकामागून एक आल्या.

या गाड्यातील स्पीकरमधून भाजपाचा जोरदार प्रचार सुरु होता. त्यामुळं रस्त्यालगतच सुरू असलेल्या सभेतील अजित पवारांच्या भाषणाला अडथळा आला. त्यावेळी अजित पवारांना काही वेळ आपले भाषण थांबवावे लागले. पण, अशा परिस्थितीवर न बोलतील ते अजित पवार कसले? त्यांनीही लगेच समयसूचकता दाखवत आपल्या खास शैलीत भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार म्हणाले की, अजित पवार काय म्हणतायेत हे ऐकायला ते आलेत. आरं…, अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशील. माईकवर पण तू सांगशील आता ती (कमळाचं नाव न घेता) नको घड्याळ घड्याळ घड्याळ.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.