…अन् अजय देवगनाचा ‘तो’ चित्रपट ठरणार शंभरावा 

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने सिनेसृष्टीत ३० वर्ष पूर्ण केली आहेत. त्याचा १००वा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. फुल और कांटेपासून गोलमालपर्यंत अनेक हिट चित्रपट त्याने बॉलीवूडला दिले आहेत. यासाठी शाहरुख खान, काजोलने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शाहरुखने म्हंटले कि, ‘माझा मित्र अजय देवगणच्या १००व्या आणि आगामी चित्रपटाची मला उत्सुकता आहे. या १०० व्या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा… तु चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठा प्रवास केला आहेस. तानाजी चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले होते.

काजोलने म्हटले कि, 30 वर्ष आणि 100 चित्रपट. फूल और कांटे ते जखम, गोलमाल ते शिवाय आणि आता शेवटी तानाजी! १०० व्या चित्रपटाच्या तुला शुभेच्छा, अशी कॅप्शन तिने इंस्टाग्राम पोस्टला दिली आहे.

‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ यामध्ये बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ तानाजींची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. दरम्यान, 150 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदार्शित होणार असल्याची माहिती अजय आणि चित्रपटाचे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.