….आणि सभागृह नेत्यांनी चालविली रिक्षा

पुणे : शहरातील बोचरी थंडी गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या थंडीत मित्रा समवेत चहा घेण्यासाठी महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे गुरुवारी सायंकाळी चक्क रिक्षा चालवीत मित्रांना चहासाठी घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले.

घाटे यांचे आई- वडील महापालिकेचे माजी कर्मचारी होते. पालिका कामगाराचा मुलगा ते सभागृह नेता असा त्याचा प्रवास आहे. त्यांनी खूप वर्षांपूर्वी आपल्या मित्रा सोबत अनेकदा चहाला जाण्यासाठी रिक्षा चालविली आहे. त्यानंतर आज अनेक वर्षानंतर त्यांनी मित्रांना सोबत घेऊन रिक्षा चालविल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.