बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्सची रांग लागलेली आहे. “सेक्रेड गेम्स’च्या यशानंतर सैफ लवकरच आणखी एका नवीन वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तो चित्रपट निर्माता अली अब्बास जफरच्या आगामी पॉलिटिकल ड्रामा “तांडव’मध्ये काम करत आहे.
ही वेबसिरीज डिसेंबरच्या अखेर प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सैफ अली खानच्या या 9-एपिसोडच्या या सिरीजचे शीर्षक आधी “दिल्ली’ असे होते. आता ते बदलून “तांडव’ असे करण्यात आले आहे.
सैफ अली खानची आगामी वेब सिरीज “तांडव’ ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज करण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये सैफ हा पंतप्रधान मुलाच्या भूमिकेत दिसणार असून तो ग्रे भूमिकेत झळकणार आहे. यात सैफ अली खानसह डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, कृतिका कामरा आणि सारा जेन डियास आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा