कैरो – पिरॅमिडचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये प्राचीन वस्तूंचा शोध लागणे सुरूच असून गेल्या आठवड्यात तेथे 2500 वर्षे जुन्या शवपेटिका सापडल्या आहेत राजधानी कैरोच्या दक्षिणेला सक्कर येथे पुरातत्व शास्त्रज्ञांना 27 शवपेटिका सापडल्या आहेत
2500 पेक्षा जास्त वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या या शवपेटिकांना अत्यंत सुंदरपणे सजवण्यात आले आहे या सर्व शवपेटिका लाकडाच्या आहेत या क्षेत्रात फार पूर्वीपासून मृतदेहांचे दफन केले जात असे यूनेस्कोच्या हेरिटेज यादीतही हा प्रदेश आहे.
सापडलेल्या या सर्व शवपेटिका बंद अवस्थेत आहेत या प्रदेशातील 36 फूट खोल विहिरीत या शवपेटिका सापडल्या आता या शवपेटिकांचे संशोधन सुरु करण्यात आले आहे. प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीची नव्याने ओळख होण्याची अशा शास्त्रज्ञांना वाटत आहे.