मुंबई – बॉलिवुडची अभिनेत्री अनन्या पांडेची आज दुसऱ्या दिवशीही एनसीबीने चौकशी केली. आर्यन खान बरोबर तिचे व्हॉट्सअप चॅट एनसीबीला आढळून आल्याने त्या अनुषंगाने तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एनसीबीने तिला बोलावून घेतले होते.
कालही तिची एनसीबीच्या कार्यालयात बोलावून घेऊन चौकशी करण्यात आली होती. अनन्या ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. ते स्वत: काल आणि आज तिला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन आले होते. एनसीबीला आम्ही या प्रकरणात पूर्ण सहकार्य करणार आहोत असे चंकी पांडे यांनी कालच स्पष्ट केले आहे.
आज दुपारी 2.20 वाजता अनन्या आपल्या वडिलांसोबत दक्षिण मुंबईतील एनसीबी कार्यालयात आली होती. त्यावेळी तेथे मिडीयाच्या लोकांची तुफान गर्दी झाली होती. त्यांना व अन्य लोकांना आवरण्यासाठी मोठा पोलिस फौज फाटा तिथे तैनात करण्यात आला होता.