बॉलीवूडमध्ये बीटाउन अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच पदार्पण केले असून तिचा एकच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पंरतु तिने खूप कमी काळावधीत एक मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. या चाहत्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी अनन्या सतत सोशल मीडियावर फोटोज् पोस्ट करत असते. अनन्याने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले असून यात स्वीट दिसणारी अनन्याचा हॉट अंदाज दिसून येत आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत अनन्याने ब्लॅक पोल्का डॉट्स असलेली व्हाईट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसते. सडपातळ बांध्यामुळे कायम निशाण्यावर असलेली अनन्या या ड्रेसमध्ये खूपच शानदार दिसते. यात तिची शरीरयष्टीही खूपच आकर्षक अशी वाटते. कारण तिने आपले वजन वाढविले असल्याने तिची फिगर चाहत्यांना आवडली आहे.
या फोटोसह तिने खूपच इंट्रेस्टिंग अशी कॅप्शन लिहिली आहे. तिने इंग्रजी गाणे “बेबी डोन्ट गो’मधील ‘better than ur ex, better than ur next’ हे बोल लिहिले आहे. यावर तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करत अनन्या “बेटर’ नव्हे, तर “हॉटर’ अशी तिची स्तुती केली. यानंतर यूजर्सने अनेक कॉमेंट करत अनन्याला हॉट, गॉरजस, सेक्सी असे कॉमेंट केले.
दरम्यान, अनन्या पांडे लवकरच कार्तिक आर्यनसोबत “पति पत्नी और वो’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री भूमि पेडणेकरही महत्त्वाची भूमिकेत झळकणार आहे.