रॅपवर अनन्या पांडेचा वेगळाचा अंदाज

बॉलीवूडमधील यंगस्टार अभिनेत्री अनन्या पांडेने खुपच कमी कालावधीत आपल्या चाहत्यांची भली मोठी यादी तयार केली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या फोटोज्‌ आणि व्हिडिओला चाहत्यांकडून खूप लाईकस्‌ही मिळतात. अनन्या नुकतीच एका शोमध्ये रॅपवर झळकली होती. यात ती एका वेगळाच अंदाजात खूपच ऍट्रॅक्‍टिव दिसत होती. यात तिच्यासोबत भूमि पेडणेकर आणि कार्तिक आर्यनही होते.

रॅपवरील व्हाईट गोल्डन वर्क केलेल्या ड्रेसमध्ये अनन्या एखाद्या परीसारखी दिसत होती. तर निळया रंगाच्या लहंगा-चोलीसोबत लाल रंगाचा दुपट्‌टा घेतलेली भूमि पेडणेकरही खूपच सुंदर दिसत होती. कार्तिक आर्यन व्हाईट कलरच्या शेरवानी आणि पिंक लॉन्ग जॅकेजमध्ये हॅंडसम दिसतो. या स्टार कलाकरांच्या फोटोज्‌ची चाहत्यांनी भरभरुन स्तुती केली आहे.

अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत “पति, पत्नी और वो’च्या रीमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत भूमि पेडणेकरही काम करत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)