आशीर्वादासाठी अनन्या पांडे मंदिरात

बॉलीवूडमध्ये नुकतेच पर्दापण करणा-या स्टारकिड्‌समधील अनन्या पांडे सर्वाधिक चर्चेतील नावांपैकी एक नाव आहे. “स्टूडेंट ऑफ द इयर-2’मधून डेब्यू करणारी अनन्याच्या अभिनयाची सर्वत्र खूपच स्तुती करण्यात आली. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्याने देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावून पूजा केली.

आपल्या यशस्वी पर्दापणानंतर आनंदित असलेल्या अनन्याने सोशल मीडिया हॅंडलवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिले पोस्ट केले की, “दीपक जला रही हूं… अय्यपाने आशीर्वाद दिया है।’. याप्रसंगी पिंक फ्लोरल कुर्त्यामध्ये अनन्या खूपच सुरेख दिसत आहे.

दरम्यान, अनन्या आपल्या आगामी “पति, पत्नी और वो’या चित्रपटाच्या रीमेकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर काम करत आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)