देशी लूकमध्ये झळकली अनन्या पांडे

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी केली आहे. यात ती म्हणते की, सकारात्मक विचार ठेवल्यास जीवनातील अंधकारावर मात करता येते. तसेच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती देशी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत ती पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि ऑरेंज रंगाचा दुपट्टा घेतल्याचे दिसते. 

अनन्याने फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये पोस्ट केले की, जेव्हा तुमच्या आस-पास सर्वत्र अंधार असेल, तेव्हा निरखून पाहिल्यास, आपणच त्या अंधारात प्रकाश बनू शकतो. हॅशटॅग खाली पीली. अनन्या ही लवकरच आपल्या आगामी “खाली पीली’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत ईशान खट्टर काम करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनन्याने चित्रपटाच्या आउटडोर शूटचे काही फोटो चाहत्यांशी शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. या फोटोंवर अनन्याच्या चाहत्यांनी लाखो कंमेटस्‌ करत लाईक्‍स दर्शविले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.