बॉलिवूडमध्ये “स्टुडेंट ऑफ द इयर 2′ या चित्रपटातून पर्दापण करणा-या अभिनेत्री अनन्या पांडेला सतत तिच्या सडपातळ बांध्यामुळे टिकेचा सामना करावा लागला आहे. याबाबत तिने अनेक वेळा सांगितले की, मी खुप खाते. पण मी अशीच आहे. आता तिने आगामी “पति पत्नि और वो’ चित्रपटासाठी वजन वाढविले आहे.
एका मुलाखतीत अनन्या म्हणाली, या चित्रपटसाठी मी 5 किलो वजन वाढविले आहे. जे माझ्यासाठी खुपच कठीण काम होते. यासाठी मी प्रत्येक तासाला काहीतरी खात होते. तसेच मी प्रोटीन कॉन्टेंटही घेतल्याचे तिने सांगितले.
मला योग्य पद्धतीने वजन वाढवायचे होते. त्यासाठी माझी ट्रेनर यासमीन कराचीवालाने माझ्या डायटपासून वर्कआउटवर बारिक लक्ष ठवले होते. त्यामुळे मला वजन वाढविणे शक्य झाले.
दरम्यान, 1978मध्ये प्रदर्शित झालेल्या “पती पत्नी और वो’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. यात अनन्या पांडेसोबत कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट या वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.