अनन्या पांडे बनली फ्लोरल ब्यूटी

 

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती फ्लोरल प्रिंट कपड्यांमध्ये दिसत आहे. एका ब्लूच्या ओव्हरवर या गुलाबी फुलांचा प्रिंट ड्रेसमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. या फोटो तिने फ्लॉवर इमोजीच्या कॅप्शनसह शेअर केला आहे. अनन्या पांडे या फोटोत खूपच हॉट अंदाजात दिसून येत आहे. 

अनन्याची ही अदा चाहत्यांना खूपच आवडली असून यावर चाहते भरभरून कमेंटस्‌ करत आहे. या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी रि-पोस्ट केला आहे. अभिनयाबाबत सांगायचे झाल्यास अनन्याचा “खाली पीली’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या चित्रपटालाही चांगले यश मिळाले आहे. 

नन्या सध्या शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीही काम करणार आहे. याशिवाय अनन्या “फायटर’ या ऍक्‍शन चित्रपटातही झळकणार आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.