नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने अगदी लहान वयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. तिच्या कामासोबतच अनन्या तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते. अभिनयासोबतच अनन्या सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. दरम्यान, कामातून ब्रेक घेऊन अनन्या पांडे सध्या न्यू यॉर्कमध्ये वेळ घालवत आहे.
View this post on Instagram
अशात अनन्या पांडे नुकतीच न्यूयॉर्कमध्ये स्वारोवस्कीच्या ‘ओपन द वंडर’ डिनरमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान ती अनेक सेलिब्रिटींसोबत दिसली. अनन्याने तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना अनन्याने लिहिले की, “न्यूयॉर्कमधील स्वारोवस्कीच्या ओपन वंडर डिनरला सर्वात आश्चर्यकारक आणि सुंदर लोकांसह उपस्थित राहणे हा सन्मान आहे. धन्यवाद JIO, Alexis Nasard आणि टीम Swarovski.”
View this post on Instagram
अनन्याने डिनरदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या स्लमडॉग मिलेनियर अभिनेत्री फ्रीडा पिंटोसोबत दिसत आहे.