मुंबई – दीपिका पदुकोण सध्या खूप बिझी ऍक्ट्रेस आहे. शाहरुख आणि प्रभासपासून ते रणवीर सिंहपर्यंत अनेक हिरोंबरोबरचे तिचे सिनेमे आगामी काळात येणार आहेत. सध्या तिच्याकडे शकुन बत्रांचा एक सिनेमा आहे. त्यामध्ये ती आणि अनन्या पांडे दोघीही एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. पण स्टारकास्ट फायनल झाली आहे.
दीपिकाबरोबर सिद्धांत चतुर्वेदीही असणार आहे. दीपिका एका सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरच्या रोलमध्ये असणार आहे आणि दीपिका ही अनन्याची थोरली बहिण म्हणून दिसणार आहे. दीपिकाच्या बरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्याच्या बरोबर धैर्य कारवा हे हिरो असतील.
पण काही कारणामुळे ही समीकरणे बिघडतात आणि दोन्ही बहिणींमध्ये मतभेद निर्माण होतात. एवढेच नव्हे तर अनन्याच्या बॉयफ्रेंडलाही गटवण्याचा प्रयत्न दीपिका करताना दिसणार अशी कथा आहे. आतापर्यंत एवढी कथा समजली आहे. पण उर्वरित कथा बघण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा रिलीज होईपर्यंत वाट बघायला लागणार आहे.