Ananya Panday: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक मिरर सेल्फी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही सेल्फी तिच्या वॅनिटी व्हॅनमधील असून, यात अनन्या दुखापतग्रस्त अवस्थेत दिसत आहे. या फोटोमुळे चाहत्यांचे लक्ष तिच्या तब्येतीसोबतच तिच्या वैयक्तिक आवडींकडेही वेधले गेले आहे. या फोटोमध्ये अनन्या ग्रे रंगाची ओव्हरसाइज हुडी घातलेली असून तिच्या हाताला स्लिंग लावलेला आहे. दुखापतीकडे हलक्याफुलक्या पद्धतीने पाहत तिने फोटोवर “2026 मध्ये नजर लागली” असा स्टिकर लावला आहे. तिचा हा मस्तीखोर अंदाज चाहत्यांना आवडला आहे. Ananya Panday वॅनिटी मिररवर सलमान-करिश्माचे पोस्टर्स या सेल्फीमध्ये अनन्याच्या वॅनिटी मिररवर लावलेले पोस्टर्स विशेष लक्ष वेधून घेत आहेत. मिररवर सलमान खान आणि करिश्मा कपूर यांच्या जुन्या फोटोचे पोस्टर्स दिसतात. यावरून अनन्या अजूनही 90 च्या दशकातील बॉलिवूडची चाहती असल्याचं स्पष्ट होतं. डिजिटल युगात असूनही जुन्या सिनेमांबद्दलचं तिचं प्रेम या फोटोमधून दिसून येत आहे. ‘मैं अपनी फेवरेट हूं’ करीना कपूरचा प्रभाव सलमान आणि करिश्मासोबतच अनन्याच्या वॅनिटी व्हॅनमध्ये करीना कपूर खानचाही प्रभाव दिसतो. मिररवर “मैं अपनी फेवरेट हूं” असा स्टिकर लावलेला आहे. हा ‘जब वी मेट’ चित्रपटातील करीना कपूरच्या ‘गीत’ या पात्राचा प्रसिद्ध डायलॉग आहे. दुखापत असूनही अनन्याचा आत्मविश्वास आणि सकारात्मक वृत्ती चाहत्यांना भावली आहे. Ananya Pandey करिअर आणि आगामी प्रोजेक्ट्स वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अनन्या पांडे नुकतीच कार्तिक आर्यनसोबत ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून पदार्पण केल्यानंतर ‘गहराइयां’ आणि ‘CTRL’ सारख्या चित्रपटांत अनन्याने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. सध्या चाहते तिच्या लवकर बरे होण्याची आणि तिच्या पुढील चित्रपटांच्या घोषणेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.