अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचा “लायगर’ हा आगामी चित्रपट काही महिन्यांपूर्वीच जाहीर झाला आहे. करण जोहरने या सिनेमाचे शीर्षक आणि त्याची रिलीज डेटदेखील जाहीर केली होती. हा सिनेमा यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार होता.
View this post on Instagram
मात्र, तोपर्यंत सिनेमाचे सर्व काम पूर्ण होईल याची शाश्वती नाही. सिनेमा आता बेमुदत पुढे ढकलण्यात आला आहे.”लायगर’चे बरेच शूटिंग अजून बाकी आहे.
View this post on Instagram
अखेरच्या टप्प्यातील शूटिंग सुरू असतानाच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी निर्बंध लागू झाले. हे निर्बंध कधी उठवले जातील आणि शूटिंग पुन्हा कधी सुरू होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.
View this post on Instagram
या अनिश्चिततेमुळे “लायगर’ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे, हा एकच पर्याय शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता “लायगर’ कधी रिलीज होईल हे कोणीही सांगू शकत नाही.
View this post on Instagram
“लायगर’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर करायला स्वतः करण जोहर उत्सुक नाही. त्याबरोबर हिंदीत पदार्पण करणाऱ्या विजय देवरकोंडाच्या फिल्मी करिअरसाठीही “लायगर’ थिएटरमध्येच रिलीज होणे फायद्याचे आहे. पण कदाचित पुढच्याच वर्षी तो रिलीज होऊ शकले.