अनंत विष्णू ऊर्फ बाबुराव गोखले…

माधव विद्वांस

“करायला गेलो एक’ या नाटकाने प्रसिद्ध झालेले अभिनेते बाबुराव गोखले यांचे आज पुण्यस्मरण. अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म 15 सप्टेंबर 1916 रोजी झाला. नवीन पिढीला ते फारसे परिचित नाहीत. अभिनेते, नाटककार, गीतकार व संगीतकार, निर्मिती अशी पंचरंगी भूमिका निभावणारे ते एकमेव नाव होऊन गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाटक सुरु व्हायची वेळ आणि संपायची वेळ अगोदर घोषित करणारे ते एकमेव रंगकर्मी होते. ते अत्यंत कडक शिस्तीचे होते, नेपथ्य, कलाकारांचा पोशाख, ध्वनी व्यवस्था, मेकअप या सर्वच बाबीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. नाटक संपल्याबरोबर कलाकारांची बिदागी त्यांचे हातात पडत असे. त्यांची स्वतः लिहिलेली अनेक नाटके रंगभूमीवर आली. “श्रीस्टार’ नाट्यसंस्थेच्या मार्फत 1955 चे सुमारास त्यांचे “करायला गेलो एक’ हे नाटक स्वतः बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांच्या अभिनयाने खुसखुशीत झाले. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व त्यात त्यांनी अभिनयही केला.

हे नाटक प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले होते. बाळ कोल्हटकरांचे पुतणे संजय कोल्हटकर सांगतात की, बाळ कोल्हटकर आणि बाबुराव गोखले यांची श्रीस्टार्स म्हणून कंपनी होती. “वेगळं व्हायचंय मला’ हे बाळकाकाचे नाटक या कंपनीमार्फत व्हायचे. बाळकाकांची नट म्हणून व्यापक ओळख या कंपनीमुळे पर्यायाने बाबुरावांमुळे झाली. बाळकाकांची “दुर्वांची जुडी’ ही नाट्यसंस्थाही नंतर पुढे आली.
“अन्‌ झालं भलतच’, “रात्र थोडी सोंग फार’, “नाटक झाले जन्माचे’, “पतंगापरी जीवन माझे’, “पाप कुणाचे शाप कुणाला’, “ते तसे तर मी अशी’, “झालं गेलं गंगेला मिळालं’, खुनाला वाचा फुटली’, संसार पाहावा मोडून’, थांबा-थांबा घोळ आहे’, पुत्रवती भव’, पेल्यातील वादळ ‘अशी अनेक नाटके मंचावर आली व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. श्रीस्टार्सची एकदम लागोपाठ 3/3 नाटकांची मालिका यायची व त्याचे एकत्रित तिकीटही मिळायचे.

बाबुराव गीतकारही होते. त्यांचा वारा फोफावला’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. हलके हलके चाल राधे हे गीत त्यांनी रचले त्याला चालही दिली आणि गायलेही स्वतःच. झुंजुमुंजु झालं चकाकलं हे गीत त्यांनी लिहिले त्याला संगीत व स्वराचाही साज चढविला गजानन वाटवे यांनी. नाखवा वल्हव वल्हव हे कोळीगीतही त्यांनीच रचले गजानन वाटावे यांनी ते संगीतबद्ध करून स्वतःच गायले.

मुशाफिरा ही दुनिया सारी हे गीत जागा भाड्याने देणे आहे या चित्रपटासाठी त्यांनी लिहिले दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केले व पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायले. तसेच त्या गावी त्या तिथवर, दारीच्या देवळीत जळो पणति, नटली चैत्राची नवलाई, निरांजन पडले तबकात, प्रीत तुझी माझी कुणाला, वारा फोफावला ही गीतेही त्यांनी लिहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)