मुंबई – मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने लालबागच्या राजाला 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. त्या मुकुटाची किंमत 16 कोटी रुपये आहे. अनंत अंबानी यांनी गणेश मंडळांना श्रद्धेने मुकुट सुपूर्द केला आहे. अनंत अंबानी यांची लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यकारिणीचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबानींचे कुटुंब दरवर्षी गणपती बाप्पासाठी भक्तीभावाने देणगी देते.
वृत्तानुसार यंदा लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान आहे. डोक्याला शोभणारा सोन्याचा मुकुट आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. 14 फुटी गणपतीच्या मूर्तीचे भव्य स्वरूप पाहून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.