शिवसेनेचे अमृता फडणवीसांना सडतोड उत्तर
मुंबई : राज्यातील शाब्दिक युद्ध काही केल्या थांबत नाही कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही अशा शब्दात बोचरी टीका केली होती. अमृता यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, अशा शब्दांमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिले आहे.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई https://t.co/5GWTWJaCe6
— Amey Ghole (@AmeyGhole) December 22, 2019
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! असं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्यासाठी आजच्या आनंदीबाई हा हॅशटॅग देखील वापरला आहे.