मेगास्टार विजयकडून रिक्षाचालकांना अन्नदान

तमिळ सिनेसृष्टीतील मेगास्टार विजय मक्कलने सालाबादप्रमाणे यावर्षीही ऑटो रिक्षा चालकांसाठी जेवणाची सोय केली होती. विजय उर्फ लाया थलापती दरवर्षी कामगार दिनाच्या दिवशी अर्थात 1 मे रोजी रिक्षाचालकांना जेवण देतो. यावर्षी निवडणुकांमुळे या कार्यक्रमाला उशीर झाला. त्यामुळे अनेकांना विजय यावर्षी रिक्षा चालकांना जेवण देणार नाही, असेच वाटत होते.

पण आपल्या शब्दाला जागत विजयने रिक्षाचालकांना जेवण आणि भेटवस्तू दिल्या. विजय दरवर्षी रिक्षावाल्यांना अन्नदान करतो. विशेष म्हणजे हा सगळा खर्च विजय एकटा उचलतो. त्याच्या या उद्दात कार्यामुळे तो ट्‌विटरवर ट्रेंडमध्येही होता.
विजयच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो थलापती चित्रपटात झळकणार आहे. तमिळ प्रेक्षकांसाठी त्याचा हा सिनेमा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. यात विजय मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नयनतारा आणि जॅकी श्रॉफही आहेत. थलापती सिनेमाला ए.आर. रेहमानने संगीत दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.