इसरोला आनंद महिंद्राचा ‘हा’ खास संदेश

श्रीहरीकोटा – चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी “चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे आगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेपर्यंत “विक्रम’ लॅंडरचा प्रवास योग्य दिशेने झाला होता. मात्र, अखेरच्या मिनिटांमध्ये लॅंडरला काय अडचणी आल्या हे समजू न शकल्यामुळे शास्त्रज्ञ, खगोल अभ्यासक आणि समस्त देशवासियांचे चंद्रावर यान उतरवण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र शास्त्रज्ञांना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा ट्विटद्वारे आपल्या खास शैलीत संदेश दिला आहे.

आनंद महिंद्रा ट्विट केले आहे कि,’संपर्क तुटला नाहीच प्रत्येक भारतीय चांद्रयान-2 च्या हृदयाचे ठोके ऐकू शकतो. ते आपल्या सर्वांना संदेश देत आहे की, जर पहिल्या प्रयत्नात यश साध्य झाले नाही तर पुन्हा प्रयत्न करा.’ असेही त्यांनी ट्विटद्वारे इसरो टीमला प्रोत्साहित केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)