नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त असे अनेक फोटो समोर येत आहेत जे ‘हर घर तिरंगा अभियानाप्रती लोकांमध्ये जोश, उत्साह वाढवत आहेत. असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यामद्ये एक महिला एका टाकीवर उभे राहून तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक वयोवृद्ध आजोबा टाकीला धरून त्या आजीबीईची सुरक्षा करत आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केला आहे. जे लोक म्हणताहेत की घरोघरी तिरंगा फडकवण्याची काय गरज आहे? अशा लोकांना उत्तर देण्यासाठी महिंद्रांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यातून त्यांना असे दर्शवायचे आहे की, किती कठीण परिस्थितीत हे दाम्पत्य तीरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
If you ever were wondering why such a fuss over Independence Day, just ask these two people. They will explain it better than any lecture can. Jai Hind. 🇮🇳 pic.twitter.com/t6Loy9vjkQ
— anand mahindra (@anandmahindra) August 14, 2022
महिंद्रा यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे की, जर तुम्ही विचार करत असाल की स्वातंत्र्यदिवशी घरोघरी झेडा लावण्याची काय गरज आहे, तर या दोघांना विचारा. एखाद्या लेक्चरपेक्षाही जास्त हे दोघे या फोटोतून शिकवत आहेत. जय हिंद.. हा फोटो महिंद्रांनी शेअर करताच काही वेळातच दीड लाखाहून अधिक जणांनी पोस्टला लाईक केले आहे. तर 13 हजारहून अधिक जणांनी शेअर केले आहे.
How much pride & joy it gives us to watch this reverence to Mother India by octogenarian Shri Girish Barman (82-year) and Smt Anupriya Barman (78-year) of village Raghunandarpur in Bongaigaon district. Absolutely thrilling.
Jai Hind 🇮🇳@PMOIndia #HarGharTiranga pic.twitter.com/NRUuANd5kc
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) August 14, 2022
हे विचारात घेण्यासारखे आहे की, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने सरकारकडून पहिल्यांदाच आपापल्या घरावर झेंडा फडकवण्याची परवानगी दिली आहे. हर घर तिरंगा अभियानासाठी ध्वज नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभक्तीची भावना जागृत झाल्याचे चित्र दिसत आहे.