आंद्रे रसेलच्या खेळीवर आनंद महिंद्रा म्हणतात…

कोलकाता – कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सुरवात झाली असून, मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलने तुफानी खेळी करत ४० चेंडूत आठ षटकार आणि सहा चौकाराच्या मदतीने ८० धावांची खेळी केली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने २३३ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्स संघासमोर ठेवले आहे.

आंद्रे रसेलच्या या तडाखेबाज कामगिरीमुळे उद्योग जगतातील महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा देखील प्रभावित झाले आहेत. आजच्या सामन्यात आंद्रे रसेलने तुफान फटकेबाजी केली, त्यामुळे यावर आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत आंद्रे रसेल फलंदाजी करीत असताना सुरक्षेच्या कारणास्तव गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला का देऊ नये असे म्हंटले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने आज दमदार फटकेबाजी केली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सची धावसंख्या २०० पार जाण्यास चांगलाच हातभार झाला. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विटर खात्यावरून आंद्रे रसेलची प्रशंसा केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.