मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ आपल्या आगामी “धर्मवीर’ सिनेमातून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणार्या ‘आनंद दिघे’ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. मंगेश देसाई या सिनेमाची निर्मिती करणार आहे. नुकतंच प्रवीण तरडे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला आहे.
धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तिक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे, ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य सिनेमा येणार आहे. “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून आनंद दिघे याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आपल्या आवडत्या नेत्याचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यामुळे लाखो शिवसैनिक डोळे लावून बसले आहेत. “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ मध्ये आनंद दिघे यांच्या जीवनातील छोटे मोठे अनुभव हुबेहूब या सिनेमात मांडण्यात येणार आहे.