गुंजाळ्यात अज्ञात व्यक्तीकडून तलाठ्यावर कत्तीने वार

अहमदनगर: राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे तलाठ्यावर अज्ञात व्यक्तीने कत्तीने वार केल्याची घटना मंगळवार दुपारी घडली आहे. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गुंजाळे येथे तलाठी पाडळकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अचानक कत्तीने वार केले. त्यात पाडळकर हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे समजते

Leave A Reply

Your email address will not be published.