गडचिरोली- गडचिरोली जंगलात वाघाने एका वृद्धेचा बळी घेतल्याचा प्रकार आज उघडकीला आला आहे. जिल्ह्याच्या अरमोरी तालुक्यातील चुरचुरा गावातील जंगलात हा प्रकार घडला.
सदर महिला आपल्या अन्य आठ महिला सहकाऱ्यांसह जंगलात गवत गोळा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी वाघाने तिच्यावर हा हल्ला केला. बाकीच्या महिलांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले. पण त्या अवधीत जखमी महिलेला मात्र आपले प्राण गमवावे लागले.
सप्टेंबर महिन्यातही याच जिल्ह्यात एका वद्ध इसमाला वाघाने ठार मारले होते. ती घटना देलोदा खुर्द गावात घडली होती. या नरभक्षक वाघांवर कारवाई करावी आणि नागरीकांना या हल्ल्यांपासून वाचवावे अशी मागणी नागरीकांनी वनविभागाकडे केली आहे. हे नरभक्षक वाघ अजून त्यांच्या टप्प्यात आलेले नाहीत.