क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

यवतमाळ – जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. प्रल्हाद डोमे (वय 60, रा. टाळळी बु.) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरवारी दुपारी 1 वाजता आर्णी मार्गावर घडली.

डोमे यांचा जनावरांचा चारा विक्रीचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे ते गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता सायकलने दारव्हा येथे जात होते. यावेळी आर्णी मार्गावरील वेअर हाऊसजवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची या मार्गावरून वाहतूक केली जाते. दिवसभर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. खड्ड्यांमुळे एका व्यक्तीला आपला जिव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.