सक्रिय प्रतिबंधित क्षेत्रांत तब्बल 500 ने वाढ

पुणे – करोनामुळे ग्रामीण आणि नगरपरिषद हद्दीत तब्बल 1 हजार 460 सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) आहेत. त्यामध्ये हवेली तालुक्‍यात सर्वाधिक 472 झोन आहेत. त्यापाठोपाठ बारामती-232, मावळ-218 तर पुरंदर तालुक्‍यात 107 कंटेन्मेंट झोन आहेत.

ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या भागात कंटेन्मेंट झोन जाहीर करून विशेष काळजी घेतली जात आहे. घरोघरी तपासण्या तसेच सुपर स्प्रेडर शोधून त्यांच्या तपासण्या करण्यावर भर दिला जात आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. यामध्ये एमआयडीसी भागातील मोठी गावे तसेच शहरालगतच्या गावांमध्ये अधिक प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून गर्दीत जाणे टाळावे. करोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या चाचणी केंद्रावर जाऊन चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.