नवी दिल्ली : देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तर सण-उत्सवानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात याचा प्रदुर्भाव दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशातील नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या आसपास गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे.
With 46,964 new #COVID19 infections, India's total cases surge to 81,84,083. With 470 new deaths, toll mounts to 1,22,111
Total active and cured cases are 5,70,458 and 74,91,513 respectively: Union Health Ministry pic.twitter.com/yClVACehX1— ANI (@ANI) November 1, 2020
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पाच लाख ७० हजार ४५८ जणांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख २२ हजार १११ इतकी झाली आहे.
आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात १० लाख ९१ हजार २३९ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात शनिवारी ५,५४८ रुग्णांची नोंद झाली, तर ७,३०३ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ बाधित बरे होऊन घरी परतले. सध्या २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती गृहविलगीकरणात, तर १२ हजार ३४२ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.