राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात करोना बाधित रुग्णाच्या संख्या वाढत असल्याने तालुक्यात चिंतेची बाब झाली आहे. तालुका रेडझोनमध्ये गेला आहे. बाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. दोन दिवसात तब्ब्ल ३७ रुग्ण वाढून तालुक्यात करोना बाधित रुग्णाची संख्या १९३ वर पोहचली आहे.
खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत असून नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड तालुक्यात सर्वाधिक करोना बाधित व्यक्ती सापडल्या आहेत. तालुक्यात आज संध्याकाळी ८ वाजेपर्यंत ९ व्यक्तीचा करोना स्वब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील बाधित व्यक्तीची संख्या १९३ वर गेली असल्याची माहिती पस सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितली.
तालुक्यात आज शेलपिंपळ्गाव, शेलगाव,राजगुरूनगर,पिंपरी, येलवाडी, चऱ्होली खुर्द येथे प्रत्येकी एक तर काळूस गावात ३ असे ९ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. या व्यतिरिक्त चाकण येथील कंपनीत एक कामगार पॉझिटिव्ह सापडला आहे.तो मावळ तालुक्यातील असल्याने त्याची गणती मावळ तालुक्यात होणार आहे.
खेड तालुक्यात काल दि. ४ रोजी २८ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या होत्या आज ९ सापडल्याने तालुका हादरला आहे तालुक्यात करोनाचा वाढता संसर्ग विचार घेऊन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. तथापि कडक लॉकडाऊन ची मागणी तालुक्यातील नेत्यांसह नागरिकांनी केली मात्र जिल्हाधिकरी यांनी ते नाकारल्याने काही नियम आणि अटीच्या अधीन राहून आठ दिवसांचे लॉकडाऊन उद्या दि ६ ते १३ पर्यंत केले जाणार आहेत.
खेड तालुक्याची करोना विषाणू संसर्ग आकडेवारी पुढील प्रमाणे –
आतापर्यंत बाधित व्यक्ती संख्या = १९३
करोनामुक्त झालेली व्यक्ती संख्या = ५३
उपचार घेत असलेल्या व्यक्ती संख्या = १३५
तालुक्यातील एकूण मृत्यू संख्या = ५
आजची बाधित व्यक्तींची संख्या = ९