दैनंदिन संचलनात सुमारे 1700 बस
पुणे : येत्या काही दिवसात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) संचलनातील बस वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची, माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे.
सुमारे 1700 बस संचलनात आणणार
पीएमपीएल दैनंदिन 1400 ते 1500 बस संचलनात असतात. परंतु, दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च तर बारावीची 3 मार्च ते 23 मार्च या दरम्यान परीक्षा होणार असल्याने या कालावधीत सुमारे 1700 बस संचलनात आणणार आहे. याचबरोबर, पीएमपीत नवीन चालक भरण्यात आल्याने चालकांअभावी कोणतीही बस उभी राहणार नसल्याची दक्षता घेण्यात आल्याची, माहिती पीएमपीएल’चे वाहतूक विभागाचे व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.