मुंबई –अमेरिकेतील निवडणुका मंगळवारी होणार असूनही त्याकडे दुर्लक्ष करून भारतीय शेअरबाजारात खरेदी झाल्याने निर्देशांकांत वाढ नोंदली गेली. कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केली.
सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 143 अंकांनी म्हणजे 0.36 टक्क्यांनी वाढून 39,757 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 26 अंकांनी वाढून 11,669 अंकांवर बंद झाला. आज रुपयाचे मूल्य तब्बल 32 पैशांनी कोसळले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा कमी झाल्यामुळे कंपनीचा शेअर 9 टक्क्यांनी कोसळला. इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, स्टेट बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.