राजगुरूनगर: राजगुरुनगर येथे खेड घाटामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घाटात रस्त्याच्या कडेला स्री जातीचे नवजात अर्भक सोडून आईने पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हे नवजात अर्भक मृतावस्थेत असल्याची हृद्यद्रावक घटना गुरुवारी उघडकीस आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सकळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर इंदिरा पाझर तलावाकडे जाणाऱ्या महामार्गानजीक रस्त्यावर नवजात अर्भक आढळून आले. महामार्गालगत ठेवलेले हे नवजात स्री जातीचे अर्भक आढळून आल्याने या महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंचर बाजूकडून राजगुरुनगरच्या दिशेने येणारे रुग्णवाहिका चालक रुग्नवाहीका घेवून जात असताना त्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी रुग्णवाहिका थांबवून या स्री जातीच्या अर्भकाला पाहून खेड पोलीस ठाण्याशी संपर्क केला. खेड पोलीस घटनास्थळी येवून त्यांनी हे नवजात अर्भक ताब्यात घेत चांडोली येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र हे स्री जातीचे अर्भक मयत असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. याबाबत रुग्णवाहिकेचे चालक योगेश सोपान शिंदे (रा. पडाळवाडी राजगुरुनगर) यांनी खेड पोलिसांत फिर्याद दिली आहे.