“आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल”; अर्थसंकल्पाबाबत अमित शाह यांची प्रतिक्रिया

Amit Shah Reaction On Union Budget 2024| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता अर्थ संकल्पाबाबत विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, देशवासीयांच्या विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह यांनी काय म्हंटले?
अमित शाह यांनी म्हंटले की, “केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वासपूर्तीच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प तरुण, महिला सशक्तीकरण यासह शेतकरी वर्गासाठी अनेक संधी निर्माण करणारा तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे,”असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
याशिवाय “हा अर्थसंकल्प व्यवसायाच्या सुलभतेला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन देशाच्या आर्थिक विकासाला नव्या उंचीवर नेण्याची वचनबद्धता दर्शवतो. याशिवाय या अर्थसंकल्पात कर नियमही सोपे करण्यात आले आहेत, ज्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे,” असेही अमित शाह यांनी म्हंटले आहे.
बजट 2024-25 मोदी जी के नेतृत्व में NDA सरकार का देशवासियों की आशा, आकांक्षा व विश्वास पूर्ति के संकल्प का प्रतिबिम्ब है।
यह बजट युवाओं व महिलाओं के सशक्तीकरण के साथ-साथ किसानों के लिए अनेक अवसर उपलब्ध करवाकर विकसित व आत्मनिर्भर भारत के निर्माण की दिशा में महत्त्वपूर्ण कदम है।…
— Amit Shah (@AmitShah) July 23, 2024
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होट्ए. यावेळी सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
हेही वाचा:
मोदी 3.0 च्या पहिल्या बजेटवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…





