नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 9.30 वाजता आहे. या बैठकीत काश्मीर खोऱ्यातील प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार आहे.
काश्मीरमध्ये होणाऱ्या हालचाली आणि रविवारी मध्यरात्री काश्मीरमधील नेते माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर रात्री उशीरा राज्यपालांनी डीजीपी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
Jammu & Kashmir: Security tightened in Srinagar in view of the imposition of section 144 CrPC from midnight 5th August. pic.twitter.com/qErNGidUDi
— ANI (@ANI) August 5, 2019
रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमावेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जात आहे.