उत्तराखंडला महत्त्वपूर्ण आघाडी

बारामती : कमलसिंगचे दमदार शतक व सौरभ रावतच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर उत्तराखंडने यजमान महाराष्ट्रावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्घेतील सामन्यात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. उत्तराखंडने बुधवारच्या 3 बाद 112 धावांवरून पुढे खेळण्यासस सुरुवात केल्यानंतर कमलसिंगने आपले शतक
पूर्ण केले.

रावतनेही सुरेख खेळी केली मात्र त्याला अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. या जोडीने 75 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र जेव्हा हे दोघेही बाद झाले त्यानंतर अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना निसटती आघाडी मिळाली. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजीत बच्छाव याने उत्तराखंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखताना 4 गडी बाद करत मोठी आघाडी
घेण्यापासून रोखले.

गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने ही पिछाडी भरून काढताना आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 140 धावा करत 96 धावांची आघाडी घेतली. आता उर्वरित दोन दिवसांत महाराष्ट्राला मोठी धावसंख्या उभारून उत्तराखंडला पराभूत करता आले तरच त्यांच्या बाद फेरीत जाण्याच्या आशा कायम राहतील. खेळ थांबला तेव्हा नाबाद अर्धशतकी खेळी करून कर्णधार अंकित बावणे एका बाजूला असून स्वप्निल फुलपगार 40 धावांवर खेळत आहे.

मध्य प्रदेश पिछाडीवर
सर्फराज खान आणि आकर्षित गोमेल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत 427 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशच्या व्यंकटेश अय्यर वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. त्यांचा पहिला डाव 7 बाद 200 असा अडचणीत आला असून अद्याप ते 227 धावांनी पिछाडीवर आहेत.
समालोचकाच्या वक्‍तव्यावर टीका
कर्नाटक व बडोदा संघांदरम्यानच्या सामन्यात माजी कसोटीपटू व समालोचक सुनील जोशी यांनी प्रत्येक भारतीयाला हिंदी भाषा यायलाच पाहिजे असे वक्तव्य केल्याने आता जोशी यांच्यावर टीका होत आहे. सध्याचे समालोचक हिंदी शब्दांचा उल्लेख कसे करतात यावर लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्याशी समालोचनादरम्यान चर्चा करत असताना जोशी यांनी हे मत व्यक्त केले. सामन्यातील दोन्ही संघ अनुक्रमे कन्नड व गुजराथी भाषिक असल्याने हा वाद निर्माण झाला. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव – 207. उत्तराखंड पहिला डाव – 79.5 षटकांत सर्वबाद 251. (कमलसिंग 101, सौरभ रावत 49, सत्यजित बच्छाव 4-71, मुकेश चौधरी 2-58). महाराष्ट्र दुसरा डाव – 46 षटकांत 2 बाद 140. (अंकित बावणे खेळत आहे 50, स्वप्निल फुलपगार खेळत आहे 40, सनी राणा 2-14). मुंबई पहिला डाव – 108.3 षटकांत सर्वबाद 427. (सर्फराज खान 177, आकर्षित गोमेल 122, गौरव यादव 4-101, कुलदीप सेन 3-88). मध्य प्रदेश पहिला डाव – 58 षटकांत 7 बाद 200. (व्यंकटेश अय्यर खेळत आहे 87, रवी यादव खेळत आहे 0, दीपक शेट्टी 2

Leave A Reply

Your email address will not be published.