कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाकडून शुल्क वाढीला स्थगिती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळाकडून घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरणे अशक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं विद्यापीठाने म्हटलं आहे. तसंच शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यातील सर्व महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्था आणि सर्व विभागाना या आदेशाचे पत्र पाठवलं असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे.