फेसबुकच्या माध्यमातून साधणार संवाद : राजू दुर्गे
पिंपरी – धनगर समाजाचे संघटन असलेल्या एल्गार सेना स्थापनेची अधिकृत घोषणा घटस्थापनेच्या दिवशी केली जाणार आहे. घटनस्थापनेच्या दिवशी 17 ऑक्टोबरला सेनेचे संस्थापक राजू दुर्गे हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही घोषणा करणार आहेत.
एल्गार सेनेच्या चार विधानसभा अध्यक्षांसह महिला ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय लवकरच राज्यातील अन्य 20 विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सेनेचे राजू दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
एल्गार सेनेच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी गजानन वाघमोडे, पिंपरी विधानसभेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण टकले, तर चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी अनुराज दुधभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एल्गार सेनेच्या चिंचवड विधानसभा महिला ब्रिगेड अध्यक्षपदी सीमा शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धनगर समाजाच्या संघटनासाठी स्थापन केलेल्या एल्गार सेनेची राज्यपातळीवर बांधणी केली जाणार आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सेनेची बांधणी तळागाळापर्यंत केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हा, तालुका व गावपातळीवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला ब्रिगेड अध्यक्ष व युवा ब्रिगड अध्यक्ष अशा एकूण पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.