नव दिल्ली : अलीगढ मुस्लीम विद्यापीठात निदर्शना दरम्यान आक्षेपार्ह घोषणा दिल्याने आंदोलकांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतीय जनता पक्षाविरूध्द आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या.
विद्यापीठातील 20 ते 25 जणांच्या गटाविरूध्द दोन समाजात तेढ वाढवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या एफआयआरमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही.
विद्यार्थ्यांनी सुधारीत नागरीकत्व कायद्या (का) विरोधात विद्यापीठाच्या आवारात मानवी साखळी उभारली होती. त्यावेळी या आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या.
या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, उत्तर प्रदेशातील एक हजार विद्यार्थ्यांविरोधात 15 डिसेंबरला हिंसाचार घडवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.