सातारा :एक विस्तार अधिकारी अकरा गावांचा कारभारी

कराड तालुक्‍यातील 97 ग्रामपंचायतींवर प्रशासक
कराड (प्रतिनिधी) –
कराड तालुक्‍यातील दि. 25 ते 27 ऑगस्ट या कालावधीत मुदत संपणाऱ्या 97 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशासक म्हणून पंचायत समितीतील ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, कृषी विभागातील 11 विस्तार अधिकाऱ्यांवर प्रत्येकी दहा ते बारा ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आहे. त्यामुळे ते या गावांचा गावगाडा कसा हाकणार? याकडे लक्ष लागू राहिले आहे.

तालुक्‍यातील वारूंजी, मुंढे, वस्ती साकुर्डी, गोटे, खोडशी, सैदापूर, भोळेवाडी, गमेवाडी, म्होप्रे, बेलदरे, पाडळी केसे, अबईचीवाडी, किरपे, साजूर, वसंतगड, मौजे साकुर्डी, हणबरवाडी, कोणेगाव, निगडी, रिसवड, गायकवाडवाडी, खराडे, शिरवडे, चिखली, खोडजाईवाडी, नवीन कवठे, बनवडी, विरवडे, पारले, इंदोली, तासवडे, वडगाव (उंब्रज), मरळी, पाल, शिवडे, चोरे, वराडे, हरपळवाडी, खालकरवाडी, बेलवडे-हवेली, पेरले, भवानवाडी, सुर्ली, पाचुंद, वाघेरी, वाघेश्वर, कामथी, करवडी, शहापूर, वडोली निळेश्वर, नांदलापूर, विंग, धोंडेवाडी, चौगुलेमळा (भैरवनाथनगर), गोवारे, चचेगाव, अंबवडे, जिंती, शेळकेवाडी (म्हासोली), महारूगडेवाडी, गोटेवाडी, म्हासोली, वहागाव, घोणशी, शेणोली, शेरे, गोळेश्वर, खुबी, कोडोली, मालखेड, काले, ओंड, कालवडे, नांदगाव, कार्वे, उंडाळे, वाठार, बेलवडे बु।।, भुरभुशी, टाळगाव, भरेवाडी, साळशिरंबे, शेवाळेवाडी (उंडाळे), घोगाव, शिंदेवाडी (विंग), घारेवाडी, कोळे, पोतले, येरावळे, बामणवाडी, येणके या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. नेमणुकीचे आदेशही गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे गावागावात चर्चेला उत आला आहे.

प्रशासकाची होणार दमछाक…
97 ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून कारभार केवळ 11 विस्तार अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या गावांचा गावगाडा हाकताना या अधिकाऱ्यांची पुरती दमछाक होणार आहे. एका ग्रामपंचायतीला महिन्यातून कसेबसे तीन दिवस देता येतील, अशी परिस्थिती आहे. या तीन दिवसात गावची विकासकामे, जनतेच्या अडीअडचणी, दाखले, उतारे यांचा मेळ कसा घालणार? आणि गावगाडा हाकणार? कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विपरीत परिणाम गावच्या विकासकामांवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.