नाणेनिधीच्या माजी अधिकाऱ्यास पाकमध्ये मानाचे पद

इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ञ रेझा बकीर यांना आज पाकिस्तानमधील स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून नियुक्‍त करण्यात आले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदतीचे पॅकेज मिळण्याची आशा आहे. त्या पार्श्‍वभुमीवर ही नियुक्‍ती करण्यात आली आहे. रेझा बकीर यांची नियुक्‍ती तीन वर्षांसाठी असणार आहे.

रेझा बकीर हे हॉर्वर्ड आणि कॅलिफोर्नियातील बर्केन्ले विद्यापिठातील माजी विद्यार्थी आहेत. 2000 सालापासून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर काम करत होते. सध्या ते इजिप्तमध्ये नाणेनिधीचे वरिष्ठ निवासी प्रतिनिधी आहेत. यापूर्वी रुमानियात नाणेनिधीच्या दूतावासाचे प्रमुख आणि कर्ज धोरण विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. वरिष्ठ अर्थतज्ञाला पाकिस्तानातील प्रमुख बॅंकेच्या गव्हर्नरपदी नियुक्‍त करून देशाचे डबघाईला आलेले अर्थकारण सुरळीत आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.