Satara | बालनाटयाला पोषक वातावरण निर्माण करायला हवे

वाई, (प्रतिनिधी) – सध्या संस्कारक्षम बालनाट्य लेखनाची गरज असून राजेश भोज ती गरज ओळखून बालनाट्ये लिहिले हे कौतुकास्पद आहे. बालनाटयाला पोषक वातावरण निर्माण करून देणे ही शासनाची जबाबदारी असून नाट्य चळवळीला गती देण्यासाठी वाईत नाट्यगृहाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन साहित्यिक लक्ष्मीकांत रांजणे यांनी केले.
येथील सर्वांगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश भोज यांनी लिहिलेल्या ‘चिंची चेटकीण आणि इतर बालनाटये’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येथील लो. टिळक ग्रंथालय येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अध्यक्षस्थानावरून रांजणे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील सुप्रसिध्द बालनाट्य अभिनेत्री आणि अष्टपैलू कलाकार हर्षदा टिल्लू उपस्थित होती.
हर्षदा टिल्लू म्हणाली, बाल नाटयांची गरज ओळखून लिहिलेले हे पुस्तक खूपच लोकप्रिय होईल व अनेक शाळांत, स्पर्धामध्ये ही नाटके बाजी मारतील.
पालकांनी आपल्या मुलांना छंद जोपाण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे तिने सूचीत केले. आपल्या भाषणात तिने प्राणी व कार्टून्सचे विविध आवाज काढत सुंदर शिळगाणी सादर केली.
या पुस्तकातील एका नाटयाचे अभिवाचन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्याला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रकाशक अजित क्षीरसागर, मुखपृष्ठ व आतील चित्रांचे चित्रकार बाळासाहेब कोलार यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
सौ. सोनाली भोज यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव विश्वास सोनावणे यांनी स्वागत केले. सौ. रंगता बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रताप यादव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश सुरशे,सोनल ठक्कर, मयूर नळ, सारिका ननावरे चारुशीला शहा,अमृता भोज यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास टिळक स्मारक संस्थेच्या संचालिका तनुजा इनामदार, सिंधू भोज, सुनीता भोज, सतीश शेंडे, नवचैतन्य हास्य योगाचे मकरंद टिल्लू, सौ. विनिता टिल्लू,
गणेश ससाणे, रवींद्र शिंदे, वसंत देशमाने, संपत कांबळे, सचिन अनपट, प्रताप महांगडे, बापूसाहेब शिंदे, जॉन फणसे, गणपत खरात, हेमंत ठक्कर, डॉ . उमेश मुळे, महादेव कायंगुडे,
सौ. भारती मांढरे, गिरीश जाधव, कुणाल शहा, संजय रांजणे, प्रा. सरोज वाघ, अर्जुन भोज, अनिल भोज, पुष्पा भोज, योगिता चौधरी,
छाया सोनावणे, वैशाली शिंदे, सारिका गवते,रा हुल भिसे, प्रमोद भिसे, प्रकाश मांढरे, ओंकार भोज, महादेव अडगळे, मंगेश भिसे, डॉ. विनय लोखंडे, हेमंत चौगुले, संतोष चौधरी आदी उपस्थित होते.





